Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
विशेष वृत्त

मोलॅसिस ; दरोडा टाकण्यासाठी “चिफ केमिस्ट” यांच्या सहीचा पुरेपूर वापर !

By sharad
September 10, 2026 2 Min Read
0

मी नाही त्यातला, आडना लावा आतला !, “पांढऱ्या” कपड्यातील काळे बोके !

कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित अध्यादेशाचा फायदा घेऊन “त्या” साखर कारखान्याने “चिफ केमिस्ट” यांच्या सहीने महाराष्ट्रात विना टेंडर, मनमानी पद्धतीने, बेहिशोबी मेट्रिक टन मोलॅसिसची परस्पर विक्री केल्याची दुसरी खळबळ जनक माहिती समोर आली आहे.

मोलॅसिस दरोडा प्रकरणात कुठेही आरोपी ठरू नये, अशी प्रार्थना “श्री दत्त” महाराजांच्या चरणी करून साक्षात “महाज्ञानी” तथा जटाधारी “महादेव” देव, पुत्र “गणपती” महाभारतातील “संजय” तथा “महादरोडेखोर” व एक “विश्वस्त” यांनी संगनमताने, शेतकऱ्यांच्या हक्काच्या दामावर “अशोक चक्र” नावाचे आयुध चालवून हा रक्कम “गुस्सा ठांगे”च्या नावे ठेव बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

विना टेंडर, परस्पर, दरोडा टाकून विक्री केलेल्या मोलॅसिसची कोट्यावधी रुपयाची रक्कम “गुस्सा ठांगे आणि “गलिक” या दोघांनी एका “जयउध” सहकारी बँकेच्या मशीनवर मोजल्याचे स्पष्ट झाले आहे. “त्या” कारखान्याच्या सभासदांची ही रक्कम कारखान्याच्या खात्यावर जमा न होता, “गुस्सा” नावाच्या कार्यकर्त्याच्या नावावर जमा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

“त्या” साखर कारखान्याचे “विस्तारीकरण”, “इथेनॉल” प्रकल्प, “वीज” निर्मिती प्रकल्प, “मोलॅसिस”वर दरोडा, अशा अंतर्गत कारभारातील गैरव्यवहाराच्या चौकशी करिता “ईडी” किंवा “इन्कम टॅक्स” विभागाकडे धाव घेतल्यास “गुस्सा ठांगे” यांच्याकडील बेनाम संपत्ती उघडकीस येईल, यासाठी संबंधित कारखान्याचे सभासद शेतकरी, स्वाभिमानीचे “राजू शेट्टी”, आंदोलन अंकुशचे “धनाजी चुडमुंगे” यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याची मते जाणकारातून व्यक्त होत असल्याचे समजते.

शेतकरी सभासदांची संपत्ती व राज्य व केंद्र शासनाच्या ताब्यातील मोलॅसिसची बेकायदा खरेदी करणाऱ्या पार्ट्यांना मॅनेज करण्याची जबाबदारी जयसिंगपूर येथील एका “अशोक” नामकाला देण्यात आली असल्याची माहिती समजते.

“त्या” साखर कारखान्यात संचालक मंडळाचे अधिकार, हुकूमशाहीने हिसकावून घेऊन, “त्या” पाच लोकांनी शेतकरी सभासदांच्या घामाच्या दामावर डल्ला मारत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, मोलॅसिस दरोडा प्रकरणावरून “त्या” साखर कारखान्यातील एकूण कामकाजाविषयी संशय निर्माण झाला असून तशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नजीकच्या काही दिवसात मोलॅसिस प्रकरण आगीचा डोंब उठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाभारतातील “संजय” कलियुगातील “महादरोडेखोर”

18 उंबरठे ओलांडून “संजय”ने कोरोना काळात “त्या” साखर कारखान्याची “फायनान्स” जबाबदारी स्वीकारली. अत्यंत “चाणाक्ष” आणि 18 उंबरठ्याचे “पाणी” चाखलेल्या संजयने आपल्या “तुटपुंजा” पगारात, घर बांधकामासाठी काढलेले “45” लाखाचे “कर्ज” जाता जाता फेडले?, दोन्ही मुलांना “विवाह” बंधनात अडकवले, आलिशान “गाडी”ची खरेदी केली?, “सोन्या”च्या पावलाने लक्ष्मी घरी आणली? पंचक्रोशीत नाव कमावले. पण, एवढा निधी आणला कुठून…….? सभासद शेतकऱ्यांचे लुटून……? आता या महाशयांना दोन वर्षाचे “एक्सटेन्शन” हवे आहे.



Author

sharad

Follow Me
Other Articles
Previous

मोलॅसिस ;दरोडा टाकण्यासाठी चिफ केमिस्ट यांच्या सहीचा वापर !

Next

मी नाही त्यातला, आडना लावा आतला !, “पांढऱ्या” कपड्यातील काळे बोके !

Recent Posts

  • धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !
  • पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !
  • आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !
  • सभासद हो, तुम कारखाना लुटला जात आहे, आपले कधी डोळे उघडणार !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • October 2026
  • September 2026

Categories

  • Privacy Polycy
  • क्राइम
  • विशेष वृत्त
  • सामाजिक

वाचकहो, आपल्या परिसरातील कोणतीही समस्या आमच्या निदर्शनास आणून द्या. अवैध व्यवसाय, भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्हाला कळवा. याबाबत खमक्यातून निश्चित वाचा फोडण्यात येईल. संपर्क करा अगर व्हॉट्सअँप वर मेसेज पाठवा.

Copyright 2026 — Khamkyanews.com. All rights reserved. Blogsy WordPress Theme

Website security powered by MilesWeb