Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
सामाजिक

धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…

By sharad
October 20, 2026 2 Min Read
0

वेळ प्रत्येकावर येते म्हणत पुढारीकडून होणाऱ्या गळचेपीचे वाभाडे..

पुणे कसबा विधानसभा मतदारसंघ : खमक्या वृत्तसेवा

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात भाजपने ‘दैनिक पुढारी’चे चेअरमन संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी आणि मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या स्नुषा सौ. स्मिता जाधव यांना उतरवल्यानंतर माजी आमदार “धंगेकर” यांनी “पांडू”च्या दलालीचे कारनामे सांगत वसुलीच्या कुंडलीची पोस्ट व्हायरल करीत जाधव यांच्या विरुद्ध थेट दंड  थोपटले आहेत. या संदर्भात एका नामवंत वेब पोर्टलने वृत्त प्रसिद्ध केले असून सध्या, या वृत्ताची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

“पुढारी”च्या सुनेसमोरील पदवीधरचा पेपर अवघड, दलालीचा हिशोब चुकता होणार! असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. “वसुली”,”पांडू”,”मनी मेकिंग मशीन”, “निवडून आणण्यासाठी हात पसरणे”,”कार्यकर्त्यांचे गळे कापणे”,”कोट्यावधीचे पॅकेज उकळले” अशा वृत्तातील शब्दाने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.

एखादी मुंगी सुद्धा भल्या मोठ्या हत्तीला “थयथयाट” करायला लावू शकते. असे आपण अनेक वेळा ऐकले आहे. कारण नसताना हत्तीने स्वतःच्या ताकदीचा वापर मुंगीला ठेचण्यासाठी करून अन्याय केला तर, मुंगी सुद्धा माघार घेत नाही. या गोष्टी “समजदार को इशारा काफी है” या सम आहेत असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. तसचं राजकारणात सुध्दा एखादी घटना लक्षात ठेऊन त्याचा हिशोब चुकता केला जातो.

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रतापसिंह जाधव यांच्या वृत्तपत्रीय कामकाजाला धंगेकर स्टाईलने आव्हान दिले आहे. धंगेकर यांनी सोशल मीडिया instagram वर केलेल्या पोस्ट मधून पुढारी वृत्तपत्र समूहावर आणि त्यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करणारी पोस्ट शेअर केली आहे.

मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात करताना मुख्यत्वे “वेळ प्रत्येकाची येते, आणि जेव्हा ती येते तेव्हा ती प्रत्येकाला पद्धतशीरपणे घेते. आज अशीच काहीशी परिस्थिती पुढारी समूहाच्या जाधव कुटुंबाची झाली आहे” असे म्हटले आहे. धंगेकर यांनी निपक्ष पत्रकारितेसाठी सुरू झालेल्या पुढारी वृत्त समूहाच्या सध्याच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे.

निवडणुकीच्या काळातील “पेड न्यूज” किंवा “पॅकेज” बातम्यांच्या पद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय राजकीय कार्यकर्ते आणि माध्यमांमधील पैशांच्या देवाण-घेवाणी संदर्भात त्यांनी शंका उपस्थित केली आहे. मुख्य म्हणजे धंगेकर यांनी या पोस्टद्वारे माध्यमांची नैतिकता आणि निवडणूक कव्हरेजच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“ज्या कार्यकर्त्यांकडे आज सुनेला निवडून आणण्यासाठी हात पसरले जात आहेत, त्याच कार्यकर्त्यांचे लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेला गळे कापून कोट्यावधींचे पॅकेज उकळले गेले, तेव्हा कुठे पेपरमध्ये चार ओळी छापल्या गेल्या,” असा थेट घाव धंगेकरांनी घातला आहे. त्याच बरोबर ‘पुढारी’च्या स्थानिक पुणे नेटवर्कची थेट नस दाबली आहे.

पुण्यात वृत्तसमूहाचा ‘पांडू वसुलीवाला’ प्युअर दलाली करतो, असा खळबळजनक आरोप धंगेकरांनी केला आहे. “दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून पाकिटं घ्यायची आणि जो जास्त देईल त्याच्या चरणी निष्ठा वाहायची. दलाली तर दलाली, वरून गद्दारी आणि नाव पुढारी !” असा टोला लगावत त्यांनी, अशा पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने तुमच्या सुनेला मतदान का करतील? असाही सवाल केला आहे. शेवटी ऑल दि बेस्ट असे म्हणत पोस्ट संपवली आहे.


Author

sharad

Follow Me
Other Articles
Previous

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !
  • पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !
  • आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !
  • सभासद हो, तुम कारखाना लुटला जात आहे, आपले कधी डोळे उघडणार !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • October 2026
  • September 2026

Categories

  • Privacy Polycy
  • क्राइम
  • विशेष वृत्त
  • सामाजिक

वाचकहो, आपल्या परिसरातील कोणतीही समस्या आमच्या निदर्शनास आणून द्या. अवैध व्यवसाय, भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्हाला कळवा. याबाबत खमक्यातून निश्चित वाचा फोडण्यात येईल. संपर्क करा अगर व्हॉट्सअँप वर मेसेज पाठवा.

Copyright 2026 — Khamkyanews.com. All rights reserved. Blogsy WordPress Theme

Website security powered by MilesWeb