Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
सामाजिक

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !

By sharad
October 20, 2026 2 Min Read
0

भाजपाने निष्ठावंतांना निवडणुकीतून डावल्यामुळे कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी, प्रचार करण्यास नकार?

पुणे : खमक्या वृत्तसेवा

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2026 मधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीची, विशेषतः जेन झींची (Gen Z) भूमिका निर्णायक ठरत आहे. या पिढीचा मतदानातील कल हर्षदा देशमुख यांच्याकडे दिसत आहे. त्याचबरोबर भाजपाने निष्ठावंतांना डावलून, दुसऱ्यालाच मैदानात उतरवल्यामुळे कार्यकर्त्यात प्रचंड नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या या भूमिकेवर नाराज होऊन कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घ्यायचा नाही असा निर्णय घेतल्याचे चर्चेत आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील प्रतिनिधी विधान परिषदेत पदवीधर मतदारांचे प्रश्न मांडू शकतात. त्यामुळे रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्यविकास, उद्योजकता आणि शिक्षणानंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी हे विषय महत्त्वाचे ठरू शकतात.जेन झींच्या भूमिकेचा विचार करता एक बाब लक्षात येत आहे की, तरुण पिढी ही भाजपाच्या एकाधिकार शाहीला वैतागली आहे. इथे निष्ठावंताना तर थारा नाहीच, उलट भाजपा पदवीधरांचे प्रश्न अडचणी सोडवण्यात अपयशी ठरल्याचा राग मनात असल्याचे दिसून येत आहे.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीच्या माहितीनुसार, पुणे विभागात 3 लाख 10 हजार 964 पदवीधर मतदार आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 91हजार 400 ,सांगली 78 हजार 366, पुणे 61 हजार 113, सातारा 42 हजार 63 आणि सोलापूरमध्ये 38 हजार 22 मतदारांचा समावेश आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघात जेन झींची भूमिका निर्णायक होताना दिसत आहे. रोजगार, शिक्षण, पारदर्शकता आणि प्रतिनिधित्व या प्रश्नांवरून जेन झीची भाजपावर प्रचंड नाराजी दिसत आहे. लोकशाहीत मतदारांचा कौल महत्वाचा असतो. निवडून दिलेल्या आमदाराचा शोध घ्यायला लागू नये, आमदार हा पदवीधरांच्या प्रश्न अडचणीसाठी प्रत्यक्ष भेटला पाहिजे, प्रश्नाची मांडणी करून न्याय देणारा असला पाहिजे. सत्तेतील उमेदवार, सत्तेत जाऊन पदवीधरांना न्याय देऊ शकत नाही, असा पदवीधर मतदारांचा मानस असल्यामुळे हर्षदा देशमुख यांचे पाठबळ वाढताना दिसून येत आहे.


Author

sharad

Follow Me
Other Articles
Previous

पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !

Next

धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !
  • पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !
  • आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !
  • सभासद हो, तुम कारखाना लुटला जात आहे, आपले कधी डोळे उघडणार !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • October 2026
  • September 2026

Categories

  • Privacy Polycy
  • क्राइम
  • विशेष वृत्त
  • सामाजिक

वाचकहो, आपल्या परिसरातील कोणतीही समस्या आमच्या निदर्शनास आणून द्या. अवैध व्यवसाय, भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्हाला कळवा. याबाबत खमक्यातून निश्चित वाचा फोडण्यात येईल. संपर्क करा अगर व्हॉट्सअँप वर मेसेज पाठवा.

Copyright 2026 — Khamkyanews.com. All rights reserved. Blogsy WordPress Theme

Website security powered by MilesWeb