Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

Khamkyanews.com

सामान्यांचा आवाज आता सर्वदूर

  • Home
  • Home
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
सामाजिक

पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !

By sharad
October 18, 2026 2 Min Read
0

पैसे घेऊन कधी पुरस्कार दिला नाही आणि पैसे देऊन कधी पुरस्कार घेतला नाही, कोणताही निधी, मदत हडप केला नसल्याची चर्चा !

पुणे :

खमक्या वृत्तसेवा : पुणे पदवीधर मतदार संघात सोशल मीडिया आणि ग्राउंड पातळीवरील पदवीधर युवक, तरुणांचा कल पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता बळावली आहे. हर्षदा देशमुख जाधव यांनी तळागाळातील पदवीधरांसाठी केलेल्या कार्याचे सर्वच पातळीवर कौतुक होत आहे. परिणामी हर्षदा जाधव यांना पदवीधारातून प्रथम पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या संस्कारात वाढलेल्या हर्षदा यांच्या वाटचालीमध्ये कोणताही अभिमान, गर्व, अधिकार शाही, अन्याय अशा शब्दाला थारा नाही. त्या सतत पदवीधरांच्या रोजगार, कौशल्य विकास अशा बाबीसाठी झटत आल्या आहेत. त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा विचार करून दिली आहे.

मतदार संघातील सध्याचे चित्र पाहता हर्षदा देशमुख जाधव यांना मोठे पाठबळ मिळत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ही उमेदवारी अत्यंत विचारपूर्वक आणि मतदार संघातील पदवीधरांचा कौल विचारात घेऊन दिली आहे. याची पदवीधरांना पूर्णतः जाणीव आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला या उमेदवारीचा फायदा होणार अशी स्पष्ट दिसून येत आहे.

पदवीधर मतदार संघातील उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांच्याकडे मेकॅनिकल इंजिनियर, एम.एस.सी. फायनान्स अँड मॅनेजमेंट, एम.ई. अशा पदव्या आहेत. त्या केजेआयई ट्रिनिटी ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य आहेत, ड्रीम सोशल फाउंडेशन च्या संस्थापक आहेत. त्यांना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि बुमन्स अचिव्हर्स यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हर्षदा देशमुख जाधव यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कोणताही पुरस्कार विकत घेतला नाही किंवा पैसे घेऊन पदवीधरांना पुरस्कार दिला नाही. यातून लुटमार करून पैसे मिळवण्याचा प्रकार केला नाही. कोणत्याही प्रकारचा निधी, मदत गोळा करून तो हडप करून त्यातून उपजीविका चालवली नाही किंवा आलिशान गाड्या घेतल्या नसल्याची चर्चा आहे. उलट पदर मोड करून पदवीधरांसाठी कार्य केल्याचे सर्वज्ञात असल्याची पुणे पदवीधर मतदारसंघात बोलले जात आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निमित्ताने त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा याविषयी मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस ठेवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची निश्चित वेळापत्रक, उत्तर पत्रिका तपासणी पारदर्शकता आणि पेपर फुटी विरोधात कठोर कायद्याची मागणीही हर्षदा यांनी केली आहे. याशिवाय ग्रामीण भागात डिजिटल ग्रंथालये, वसतिगृह, शिष्यवृत्ती तसेच शिक्षक भरती, वेतन आणि अनुदानाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मिडिया इमेज


Author

sharad

Follow Me
Other Articles
Previous

आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !

Next

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • धंगेकरांनी ठोकला जाधवांच्या विरोधात शड्डू…
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना जेन झींचा निर्णायक पाठींबा !
  • पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा बोलबाला !
  • आंधळ दळतयं अन् कुत्रं पिट खातयं, श्वान आण्ण्या, ज्याव्या, म्हैशाने पुरता लुटले !
  • सभासद हो, तुम कारखाना लुटला जात आहे, आपले कधी डोळे उघडणार !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • October 2026
  • September 2026

Categories

  • Privacy Polycy
  • क्राइम
  • विशेष वृत्त
  • सामाजिक

वाचकहो, आपल्या परिसरातील कोणतीही समस्या आमच्या निदर्शनास आणून द्या. अवैध व्यवसाय, भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्हाला कळवा. याबाबत खमक्यातून निश्चित वाचा फोडण्यात येईल. संपर्क करा अगर व्हॉट्सअँप वर मेसेज पाठवा.

Copyright 2026 — Khamkyanews.com. All rights reserved. Blogsy WordPress Theme

Website security powered by MilesWeb