“त्या” कारखान्यातील दरोडेखोरीच्या धंद्याबद्दल सभासदांच्यात तिव्र संताप !
परराज्यातील अंध सभासद, कामचुकार कामगारांच्या लाळघोटे विश्वासाचा फायदा त्या पाच मंडळींनी उचलला
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
“त्या” कारखान्यातील गैरप्रकार, अनियमितता, बेकायदेशीर कामकाज, गले लठ्ठ भ्रष्टाचार, विना टेंडर, बेकायदा मोलॅसिसची विक्री अशा गैरप्रकाराविरुद्ध महाराष्ट्रातील सभासदांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही परराज्यातील अंध सभासद आणि, पुढे पुढे करणारे कामचुकार कामगार यांच्या लाळघोटे विश्वासाचा फायदा घेवून “त्या” पाच व्यक्तींनी महाराष्ट्रातील खराखुऱ्या मालक, सभासदांना, सप्लायर, ठेकेदार यांच्या माध्यमातून लुटले आहे, बेसुमार पैशाची लुट करून सभासदांचा गळा घोटत असल्याची चर्चा गुरुवारी “श्री दत्त” महाराजांच्या कार्यस्थळावर होती.
मा.चेअरमन, वि.संचालक, वि.चेअरमन, मा. कार्यकारी संचालक, वि.सचिव, वि फायनान्स मॅनेजर आणि चीफ केमिस्ट यांनी संगणमत करून महाराष्ट्रातील सभासदांच्या मालकीच्या मोलॅसिसची विना टेंडर, परस्पर विक्री करून 12 कोटीचा डल्ला मारल्याचे सर्वज्ञात झाले आहे. झाकून चाललेल्या भ्रष्टाचाराला “खमक्या”ने वाचा फोडल्यामुळे दरोडेखोरीचे धंदे समोर आल्याचे कार्यस्थळावरील उपस्थित सभासद शेतकरी बोलत होते.
अंध व फाजील विश्वास ठेवणाऱ्या सभासद, कामगारांना, त्या पाच मंडळीनी अरबो रुपयांच्या मोलॅसिसची परस्पर विक्री, कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून बंद ठेवलेली डिस्टलरी, तोट्यातील विज प्रकल्प, कामगार सोसायटीतील कोट्यावधी रुपये, विधानसभा व बॅक निवडणुक पा पार्श्वभूमीवर “जयउध” सहकार बँकेत कामगारांच्या नावावर काढलेली कर्जे आणि सप्लायर यांनी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या आगाऊ रकमा याची साधी भनक सुध्दा नाही.
कारखाना विस्तारीकरण, साखर विक्री, परचेस मटेरियल, ठेक्या मधील 20 टक्के कमिशन, कामगारांचा बोनस, सरासरी कमी रिकव्हरी मधील भ्रष्टाचार, रासायनिक खते, अधिकाऱ्यांचे राजीनामे, जबरदस्तीचे राजीनामे अशा गैर व्यवहार, प्रकारातून “त्या” पाच “घुशींनी” संगनमताने कारखाना आतुन पोखरल्याची तसुभर देखील कल्पना अंध सभासद, कामगारांना नाही.
कारखान्याचे मशीन असताना “जयउध” सहकारी बॅकेच्या मशीनवर बेकायदा नोटा मोजणारे “सिस्टम इंडिया”चे प्रतिनिधी “गिलक” आणि “हस्तक गुस्सा ठांगे” हे दोघे कोण आहेत?. मॅनेजर “बबल गम”ने असे बेकायदा गैरकृत्य कसे करू दिले. आता खाजगी व्हीडीओ फुटेच्या माध्यमातून हा तक्रारीचा चेंडू “आरबीआय”च्या हातात दिला जाणार असल्याचे समजते.
गणपती बाप्पा मोरया !
“त्या” कारखान्यात राजीनामा दिलेल्या सचिवांच्या घरी, बंगल्यावर “धुणी-भांडी” करायला जाणाऱ्या “मोलकरणी”ला “सोडणे व आणणे” याकरीता कारखान्याच्या “शिपाई”याची नियुक्ती करण्यात आली आहे. “पगार आणि दोन लिटर पट्रोल” सभासद मालकांच्या कारखान्यातील आणि काम सचिवाच्या घरातील “मोलकरणी”ला “ने-आण” करण्याचे ! हा किती मोठा गैरकारभार?, अजून किती, कारखाना लुटणार आहात?, उद्योग समुहाच्या सर्वेसर्वांची एवढी लाचारी का? कुठे भिजत घोंगडे आहे? की सचिव भ्रष्टाचाराचे साक्षिदार आहेत? याचे सर्वेसर्वांना लवकरच उत्तर द्यावे लागणार असल्याचे समजते.
काहीतरी भानगड आहे?
उद्योग समुहाच्या, सर्वेसर्वांच्या भ्रष्ट कारभारातील हुकमी “एक्क्या”चे पान सचिवांच्या हातात असल्याने त्यांना “अभय” दिला जात असल्याची चर्चा आहे. संगनमताच्या साखळीतील सचिव हे अनुभवी “मणी” आहेत. त्यांनी आत्तापर्यंत दोन वेळा राजीनामा देऊन जातो अशी “भिती” सर्वेसर्वांना घातली आहे. पण, समजूत काढून राजीनामा नाट्ट्यावर पडदा टाकला. आता या प्रकरणी सर्वेसर्वा “लाचारी” पत्करणार की, राजीनामा मंजूर करणार? याकडे तमाम शेतकरी सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोट्या भाऊ जिंदाबाद !
महाभारतातील “संजय तथा “गोट्या” भाऊ यांना कारखाना ओरबडून खाण्यासाठी दोन वर्षाचे “एक्सटेन्शन” हवे होते. पण, त्यांच्या भ्रष्ट कामकाजाची कुंडली टप्प्याटप्प्याने बाहेर पडणार याची चुणूक पहायला मिळाल्याने भाऊनी जाग्यावर “पलटी” मारली आहे. आता त्यांना एक्सटेन्शन नको आहे, “मी नाही त्यातला, अण् आडना लावा आतला” अशा नैतिकतेला साजेशी अशी “झाकली मूठ सव्वा लाखाची” उघड व्हायला नको, म्हणून भाऊंनी “पळ” काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
